Advertisement
ठाणे : मी 82 वर्षांचा आहे, मोरारजी देसाई देखील 82व्या वर्षी पंतप्रधान झाले होते, पण मी हा कित्ता गिरवणार नाही. मी कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी होणार नाही, तसंच सत्तेची जबाबदारीही घेणार नाही, असं सांगून खुद्द शरद पवारांनीच पंतप्रधान व्हायच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जावं का याची चाचपणी करत आहोत, पण अजूनही निर्य झालेला नाही. समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं, असं माझं मत आहे, असंही पवार म्हणाले. मोदी सरकारविरोधात पर्याय देण्यासाठी माझ्याच घरात बैठक झाली. हे लगेच होणार नाही. त्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहे. काही विषय ठरले आहे. त्यानुसार, निर्णय घेण्याचे ठरले आहे, असंही पवारांनी तिसऱ्या आघाडीबद्दल सांगितलं.
