Advertisement
पुणे : शिंदे गटाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. पावसाळी अधिवेशनामध्ये डासांच्या प्रश्नावर गोंधळलेले तानाजी सावंत आता आपल्या धावत्या दौऱ्यावरून चांगलेच ट्रोल झाले आहे. सावंत यांच्या पुणे दौऱ्यात तीन दिवस घर ते खाजगी कार्यालयाला जाण्याची माहिती दिल्याने चांगलेच ट्रोल झाले.
वसाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंत्री आणि आमदार आपआपल्या मतदारसंघात रवाना झाले. तानाजी सावंत हे पुण्याला रवाना झाले. त्यामुळे त्यांचा खास दौरा प्लॅन करण्यात आला. गुरुवार 25 ऑगस्ट ते रविवार 28 ऑगस्टपर्यंत हा दौरा असणार आहे. पण, या दौऱ्यामध्ये शुक्रवारी पुण्यात कार्यक्रमाचे असं काही भन्नाट नियोजन करण्यात आलं आहे की ते पाहून तुमचंही डोकं गरागरा फिरायला लागले. सकाळी 11 वाजता कात्रज येथून निघालेले तानाजी सावंत यांचा दौरा 3 वाजेपर्यंत पुणे कार्यालयात पोहोचला. त्यानंतर दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत बालाजी नगर पुणे कार्यालय येथून कात्रज, पुणे कार्यालय. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत कात्रज पुणे कार्यालय येथून कात्रज, पुणे कार्यालयाकडे, असा आयोजित केला. अखेरीस रात्री 8 वाजता बालाजीनगर पुणे कार्यालय येथून कात्रज, पुणे निवास्थानाकडे प्रयाण. असा काही पहिल्या दिवसाचा दौरा आखला.
