Advertisement
मुबंई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष हा फक्त राज्य पातळीवर मर्यादित राहिलेला नाही. तर तसा संघर्ष देश पातळीवरही पाहायला मिळतोय. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असतानाकाँग्रेसचं अधिकृत YouTube चॅनल अचानक डिलीट करण्यात आलं आहे. काँग्रेसकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. आमचे YouTube चॅनल 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस' हटवण्यात आले आहे. आम्ही त्याचे निराकरण करत आहोत आणि Google/YouTube टीमच्या संपर्कात आहोत. तांत्रिक बिघाड झालाय की काही छेडछाडीचा हा प्रकार आहे याचा आम्ही तपास करत आहोत. आमचे YouTube चॅनल लवकरच पूर्ववत सुरु होईल, अशी आशा आहे, अशी माहिती काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया विभाग हाताळणाऱ्या टीमकडून देण्यात आली आहे.
