#

Advertisement

Wednesday, August 24, 2022, August 24, 2022 WIB
Last Updated 2022-08-24T11:40:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आमदार का भिडले ? नक्की काय घडलं?

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राच्या विधीमंडळात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांविरोधात भिडल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र विषय भरकटवण्याचा हा सत्ताधाऱ्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केली आला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नक्की काय घडलं? 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार हातात बॅनर घेऊन सकाळी 10.15 वाजता जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत होते. विरोधी पक्षांचे आमदार निदर्शने करण्यासाठी आले. विरोधी पक्षनेते अजित पवारही आले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर खालच्या बाजूला सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार निदर्शने करत होते. त्यांच्या मागे वरच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांचे आमदार निदर्शने करत होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. विरोधी पक्षांचे काही आमदार यात अमोल मिटकरी आणि अनिल पाटील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या पुढे निदर्शने करू लागले. सत्ताधारी पक्षातील आमदार महेश शिंदे, महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले यांची विरोधी पक्षांतील आमदार अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांच्यासोबत बाचाबाची सुरू झाली. आमदारांच्या बाचाबाचीचे रुपांतर धक्काबुक्कीत झालं. सत्ताधारी पक्षांचे आमदार आणि विरोधी पक्षांचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांना धक्काबुक्की केली. एकमेकांना हात दाखवून इशारे दिले. एकमेकांना शिवीगाळही करण्यात आला. सत्ताधारी पक्षातील आमदार भरतशेठ गोगावले आणि प्रताप सरनाईक तसेच विरोधी पक्षातील रोहित पवार आमदारांची हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करत होते.