#

Advertisement

Monday, September 5, 2022, September 05, 2022 WIB
Last Updated 2022-09-05T10:41:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

ज्यांच्यासोबत आमचं 25 वर्ष लफडं..... !

Advertisement

जळगाव : शिवसेना कुणाची यावरुन जो येतो तो आमच्यावर बोलतो. पण शिवसेना आमचीच आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही काय कमळावर विजयी झालो का? असा सवाल उपस्थित करत ज्यांच्यासोबत आमचं २५ वर्ष लफडं होतं, त्याला आम्ही आय लव्ह यू म्हटलं, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी इथं जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली.
आमदार होण सांध झालं राहिलेले नाही, पहिल्यांदा वेळी कुणीही आमदार होतं, मात्र पुन्हा आमदार होणं कठीण असतं, हे पब्लिक है ये सब जानती आहे, हे लोक आता वेड बनणारं नाही. ज्याप्रमाणे भाजीपाला घेतांना तो निवडून घेतात त्याप्रमाणे पाच वर्षांसाठी आमदार निवडतात. असेही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
आम्ही बाळासाहेबांना सोडलेले नाही, आम्ही दिघे सोडलेलं नाही, आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही भगवा झेंडा सोडलेला नाही. त्यामुळे शिवसेना आमचीच आहे, आम्ही फक्त आमच्यासोबत जो राहिल तो आमचाच असं बोललो मात्र आता मैदानावरुन लढाया, दसरा मेळाव्यावरुन लढाया.. काय चाललंय, असे म्हणत दसरा मेळाव्याच्या वादावरून गुलाबराव पाटील यांनी खंत व्यक्त केली.