#

Advertisement

Monday, September 5, 2022, September 05, 2022 WIB
Last Updated 2022-09-05T10:41:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

पुण्यात बसचालक आणि वाहकासह तिघांना मारहाण

Advertisement

पुणे : वाहतूककोंडीत अडकलेल्या एका रहिवाशाने पुणे मनपाच्या बस चालकाशी वाद घातला आणि त्याला मारहाण केली. रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सेव्हन लव्हज फ्लायओव्हरजवळ हा प्रकार घडला. पुण्यातील शंकरशेठ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी कारला डावीकडे वळण घेता येत नव्हते. म्हणून हा वाहनचालक संतापला आणि त्याने पत्नी तसेच आपल्या दोन मुलांना घटनास्थळी बोलावले. यानंतर पीएमपीएमएल बसच्या चालक, वाहक आणि पीएमपी ट्रान्सपोर्ट बॉडीच्या सुपरवायझर अशा तिघांना त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी खडक पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आणि सार्वजनिक सेवकाला दुखापत केल्याप्रकरणी संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही बस आळंदीहून स्वारगेटला जात होती. यावेळी उड्डाणपुलाजवळ वाहतूक कोंडीत ही बस अडकली. त्यामुळे बसचालक लक्ष्मण धुमाळ यांनी इग्निशन बंद केले तसेच ते वाहतूककोंडी कमी होण्याची वाट पाहत होते. मात्र, यावेळी कारमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मीरा सोसायटीतील त्याच्या मुलाच्या गॅरेजकडे जाणाऱ्या लेनमध्ये डावीकडे वळण घ्यायचे होते. त्याच्यासमोर बस असल्याने त्याला तसे करता आले नाही.
याठिकाणी वाहतूक कोंडी होती. त्याने काहीवेळ हॉर्नही वाजवला. मात्र, काहीच झाले नाही. तर बस पुढे जाण्यास काहीच जागा नव्हती, असे चालक धुमाळ यांनी त्यास सांगितले होते. मात्र, तरीही तो व्यक्ती वाद घालतच राहिला. अखेर त्याने आपल्या दोन मुलांना तसेच पत्नीला बोलावले आणि मारहाण केली. यावेळी पीएमपीएमएल गॅरेज पर्यवेक्षक वाबळे यांनी मध्यस्थी केली तसेच बसमधील प्रवाशांनीदेखील तसे करू नका, असे सांगितल्यानंतरही त्यांनी मारहाण सुरूच ठेवली.