Advertisement
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. बाळसाहेब ठाकरेंची सावली म्हणून ठाण्यामध्ये ज्याची ओळख होती, त्या चंपासिंग थापाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. थापा हे कित्येक वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून काम पाहत होते.
बाळासाहेबांचे विचार घेवून तुम्ही पुढे जात आहात, म्हणून थापा माझ्या सोबत आलेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
चंपासिंग थापा 30 वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आले. मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून त्यांनी पोटापाण्यासाठी छोटी-मोठी कामं करायला सुरूवात केली. भांडूपचे नगरसेवक के.टी.थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला आणि काही काळातच थापा बाळासाहेबांचा लाडका झाला. बाळासाहेब ठाकरे यांचं जेवण, औषधांच्या वेळा यासारख्या रोजच्या गोष्टींवर थापा लक्ष ठेवून असायचा. मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब आणखीनच हळवे झाले होते, तेव्हा थापाने बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेतली. या सगळ्या काळात थापा बाळासाहेबांच्या कायमच जवळ होता.
