#

Advertisement

Friday, September 30, 2022, September 30, 2022 WIB
Last Updated 2022-09-30T11:52:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कसोटीच्या काळात रश्मी ठाकरे मैदानात

Advertisement

मुंबई : ठाकरेंच्या 'मातोश्री' जवळच्या कलानगर जंक्शन शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं  पोस्टर लावण्यात आलं आहे. या पोस्टरवर रश्मी ठाकरे यांचा फोटो आहे. शिवसेनेच्या पोस्टरवर पहिल्यांदाच रश्मी ठाकरे झळकल्यात. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये रश्मी ठाकरे यांचा फोटो लक्ष वेधून घेतो आहे. 'काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा, हा वारसा संघर्षाचा आहे' असा उल्लेख शिवसेनेच्या या पोस्टरवर करण्यात आला आहे. याच कसोटीच्या काळात रश्मी ठाकरेंना प्रत्यक्ष मैदानात उतरवण्याची रणनीती शिवसेनेनं आखली आहे.
शिवसेनेच्या बिकट काळात रश्मी ठाकरे शिवसेनेत आता सक्रीय झाल्यात, हेच या पोस्टरवरून स्पष्ट दिसत आहे. त्यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात रश्मी ठाकरेंनी पहिली चाल केली. पहिल्यांदा रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडला. आता, दिघेंच्या देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं त्यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एण्ट्री केली. रश्मी ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या टेंभी नाका इथल्या देवीचं दर्शन घेतलं. रश्मी ठाकरेंच्या ठाणेवारीमुळं शिवसैनिकांमधला उत्साह वाढला आहे. गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा झाला, त्यावेळी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा खास उल्लेख करून सत्कार करण्यात आला. याचाच अर्थ येणाऱ्या काळात रश्मी ठाकरे शिवसेनेच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याचं मानलं जात आहे.