Advertisement
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणामुळे आर्थर रोड जेलमध्ये आहेत. याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा उपस्थितीत होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचा आणि संजय राऊत यांचा काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भातखळकर यांनी यासंदर्भात तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे.
