#

Advertisement

Tuesday, September 20, 2022, September 20, 2022 WIB
Last Updated 2022-09-20T11:25:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

चंद्रकांत पाटील यांच्यावर मराठा आरक्षणासंदर्भात मोठी जबाबदारी

Advertisement

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल. ठाकरे सरकारच्या काळात या उपसमितीचे अध्यक्ष हे अशोक चव्हाण होते. तर एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील हे सदस्य होते.  एकनाथ शिंदे आणि संभाजीराजे यांच्या भेटीत मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. मराठा समाजाशी संबंधित सर्व विषयावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. संभाजीराजेंनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर यावेळी चर्चा करून शासनाकडून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केल्याची माहिती आहे.