#

Advertisement

Wednesday, September 28, 2022, September 28, 2022 WIB
Last Updated 2022-09-28T12:58:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आता..., भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून संघर्ष

Advertisement

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गड दसरा मेळावा कृती समितीत संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचा परिणाम म्हणजे आष्टीतील जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. या राजीनामा नाट्यावरून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या भगवानगडावरील दसरा मेळाव्यावर आता राजकारण सुरू झाले आहे.
भगवान गडावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी राजकीय भाषण करण्यास विरोध केला होता. आता त्याच भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यासाठी भगवानगड दसरा मेळावा कृती समितीने पुढाकार घेतला आहे.
भगवान भक्ती गडावरील दसरा मेळावाला अडसर म्हणुन हा मेळावा असल्याचे समजून अनेक वंजारी समाजातील बांधव नाराज असल्याचं पाहायला मिळतं आहे.  जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेऊन समिती स्थापन केली. याच माध्यमातून भगवानगडावर दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि या समितीत संघर्ष सुरू झाला आहे. दसरा मेळावा एकच होईल समाजात फूट पाडण्याचं काम करू नये, अशा भावना व्यक्त सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे आता हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.