#

Advertisement

Wednesday, September 28, 2022, September 28, 2022 WIB
Last Updated 2022-09-28T13:01:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न !

Advertisement

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे, भाजप आणि शिंदे गटामध्ये युतीची चर्चा रंगली आहे. पण, आता शिंदे गटाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपसोबत हातमिळवणीची चर्चा सुरू आहे. शिंदे गटासोबतही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. पण, आता मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी गंभीर आरोप केला आहे.  मनसे पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. विविध प्रकारची अमिष आणि पदांची लालूच दाखवली जात आहे. मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका केल्या जात आहेत, असा आरोपच मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे. भायखळ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन शिंदे गटाकडून आमिष दिली जात आहे. वेगवेगळी पदं देणार असल्याचे सांगत आहे. शिंदे गटासमोर आधीच समोर एक शत्रू आहे, पण ते आणखी शत्रू का निर्माण करत आहे, त्याबद्दल कळत नाही. याबद्दल एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विनंती केली आहे, असंही नाईक यांनी सांगितलं.