#

Advertisement

Tuesday, September 27, 2022, September 27, 2022 WIB
Last Updated 2022-09-27T11:34:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव चालतं ; मग. मुलगा आणि नातू का चालत नाही?

Advertisement

अहमदनगर : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव चालतं, बाकी सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेलं मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पारनेरमध्ये आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक लाख महिलांची मोहटा देवी दर्शनाची मोफत बस सेवा सुरू करण्यात आली. त्याच्या उद्घाट्नात सुप्रिया सुळे बोलत होत्या. 
तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरं घर करा, तुम्हालाही शुभेच्छा. परंतु, अशाप्रकारे ठाकरे कुटुंबावर आरोप करणं चुकीचे आहे. 
शरद पवार यांच्यावर ज्यावेळेस काँग्रेसने कारवाई केली, त्यावेळेस साहेबांनी स्वतंत्र पक्ष काढून उभे राहिले त्यावेळेस त्यांनी काँग्रेस माझी आहे, त्यातील माणसं माझी आहे असे म्हटले नाही. सध्याचे राजकारण पाहून बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील असेही सुप्रिया सुळे म्हणाले. 

भारतीय जनता लॉन्ड्री... : सुळे
कुठलाही पक्ष छोटा किंवा मोठा नसतो. त्याच्या मागे एक वैचारिक बैठक असते. भाजप हा मोठा पक्ष आहे. देश पातळीवरचा पक्ष आहे. ते राजे आहेत त्यांनी छोट्या लोकांची चेष्टा करावी ही त्यांची संस्कृती असेल असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा उल्लेख करताना भारतीय जनता लॉन्ड्रीचे अध्यक्ष असा उल्लेख सुप्रिया सुळे यांनी केला.