Advertisement
बारामती : बारामती तालुक्यात गावांना खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेटी दिल्या. यावेळी डोर्लेवाडी गावात गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी दोन गटांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोरच गोंधळ घातला. जेजुरी ते नीरा नरसिंहपूर रस्ता डोर्ले वाडी गावातून जातो, गावठाणात रस्ता रुंदीकरण 10 मीटर व्हावं की 7 मीटर यावरून गावकऱ्यांमध्ये वाद आहे. याच मुद्यावरून दोन गट सुप्रिया सुळे यांच्यासमोरच वाद घालू लागले. खुद्द सुप्रिया सुळे यांना दोन्ही गटाची समजूत काढावी लागली. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं. सुळे यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी संमती दर्शवली. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं. सुळे यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी संमती दर्शवली.
