#

Advertisement

Tuesday, September 13, 2022, September 13, 2022 WIB
Last Updated 2022-09-13T18:02:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

उदयनराजेंचे काका शिवाजीराजे भोसलेंचं निधन

Advertisement


सातारा : शिवाजीराजे भोसले यांचं वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांचं निधन झालं. आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शिवाजीराजे भोसले हे कै.अभय सिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. याशिवाय उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. आज रात्री शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव अदालत वाड्यात आणण्यात येणार आहे. बुधवारी त्यांच्यावर संगम माहूली येथील कैलाश स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सायंकाळी साधारण साडे पाचच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला.