#

Advertisement

Tuesday, September 13, 2022, September 13, 2022 WIB
Last Updated 2022-09-13T17:56:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

एकनाथ शिंदे हिंदू गर्व गर्जना यात्रा सुरु करणार

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांच्या गटातील सर्व आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा झेंडा घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शिंदे यांच्या नव्या दौऱ्याबद्दल निर्णय झाला. एकनाथ शिंदे हिंदू गर्व गर्जना नावाची यात्रा सुरु करणार आहेत. त्यांच्या या यात्रेची लवकरच अधिकृत घोषणा होईल. येत्या 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान ही यात्रा होणार आहे. प्रत्येक आमदार त्यांचा मतदारसंघ असलेल्या जिल्ह्यांमध्ये जातील. त्यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेचं नेमकं काय मत आहे, त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, याबद्दल माहिती घेतील. तसेच आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आहोत. हिंदुत्वसाठी काय करतोय, हे पटवून देण्याचं काम आमदार करतील. एकनाथ शिंदे वेळोवेळी या यात्रेत सहभागी होतील.