#

Advertisement

Monday, September 19, 2022, September 19, 2022 WIB
Last Updated 2022-09-19T11:49:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीवर वरचष्मा कायम

Advertisement

पुणे : शरद पवारांच्या सत्ताकेंद्र बारामतीला सुरूंग लावण्यासाठी दोन केंद्रीय मंत्री बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत, मात्र दरम्यान झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्हा आपलाच असल्याच राष्ट्रवादीने दाखवून दिलं आहे. निकाल लागलेल्या 61 ग्रामपंचायतींपैकी केवळ 8 जागांवर भाजपला यश मिळालंय, तर राष्ट्रवादीने जवळपास 45 ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात शिरण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या मंत्र्यांना दौऱ्यासाठी पाठवलं आहे. मोठा कार्यक्रम आखण्यात आलाय, पण आज आलेल्या ग्रामपंचायत निकालात या दोन्ही मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर पवारांच्या राष्ट्रवादीने वरचष्मा कायम ठेवला आहे.