#

Advertisement

Monday, September 19, 2022, September 19, 2022 WIB
Last Updated 2022-09-19T11:52:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना दिला सल्ला!

Advertisement

पंढरपूर : शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार यावरून वाद निर्माण झाला आहे. 'दसरा मेळावा राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्याला विरोध आजपर्यंत कुणी केला नाही. शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे गणित आहे. शिंदे गटाला बीकेसीचे मैदान मिळाले आहे, त्यामुळे आता त्यांनी विरोध करू नये', असा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. दसरा मेळावा राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्याला विरोध आजपर्यंत कुणी केला नाही.  दसरा मेळावा मागील 40 वर्षांपासून पाहतोय. शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यामुळे दसरा मेळावा घ्यायची त्यांची परंपरा आहे. शिंदे यांना जर BKC मैदान दिलं असेल तर दुसऱ्यांना विरोध करणे योग्य नाही असा सल्ला पवार यांनी दिला आहे.