Advertisement
मुंबई : मुंबईमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बोलणार आहेत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे बूथ जिंका मुंबई जिंका, असा नवीन मंत्र उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना देणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीआधी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहेत. शिंदे गट आणि भाजपविरोधात उद्धव ठाकरेंनी आक्रमक रणनीती आखली आहे. बूथ जिंका निवडणूक जिंका, असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंची ही रणनीती भाजपसारखीच म्हणावी लागेल. भाजपनेही 2014 पासून पन्ना प्रमुख आणि बूथ प्रमुख नेमून या प्रमुखांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. भाजपच्या या रणनितीचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावर झाला. उद्धव ठाकरे यांनीही अशाचप्रकारे बूथ जिंका, निवडणूक जिंका, अशी रणनीती अवलंबली आहे.
