Advertisement
अमरावती : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे हेच आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा सत्यानाश केला आहे. तर शिंदे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि संस्कार कायम ठेवण्यासाठी भाजपासोबत पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला, अशी सणसणीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथे पक्षप्रवेश कार्यक्रमात केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली. ते म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाबाबत भाष्य केलं. पण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. यामुळे राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसनेची सूत्रे नव्हती', उद्धव ठाकरेच त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख असल्याने एकनाथ शिंदे यांचा त्यात काही दोष नाही असा निर्वाळा बावनकुळे यांनी दिला आहे.
