Advertisement
मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची काल भेट झाली. भाजपचे पदाधिकारी असलेल्या आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची भेट झाली. अशोक चव्हाण यांनीही ही भेट झाल्याचं मान्य केलं, पण, या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. आशिष कुलकर्णी यांच्याकडे कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. काँग्रेसचा परवा दिल्लीला मोर्चा आहे, त्यामुळे मी उद्या दिल्लीला जाणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही मी आणि अशोक चव्हाण गणपतीमध्ये भेटलो होतो. आमची भेट नॉर्मल होती, अशी प्रतिक्रिया दिली.
