#

Advertisement

Friday, September 2, 2022, September 02, 2022 WIB
Last Updated 2022-09-02T12:12:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिवाजी पार्कवर राज ठाकरे घेणार दसरा मेळावा ?

Advertisement

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याच्या दिवशी भव्य सभेचं आयोजन करत शक्ती प्रदर्शन केलं जातं. पण यावर्षी वातावरण वेगळं आहे. शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. शिवसेनेचा बंडखोर गटदेखील दसरा मेळाव्याबद्दल विविध दावे करत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घ्यावा, असं विधान रामदास कदम यांनी केलं. त्यानंतर आज मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्याचं आवाहन केलं आहे. 
"बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार असं म्हणत 'यू टर्न' आणि 'बंडखोर' असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगते ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता त्यापैकी कुणातच नाही. ज्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील मराठी भूमिपूत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टाचा विषय ठरत आहे, याहून मोठी शिकांतिका ती कोणती?", असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला