#

Advertisement

Wednesday, September 14, 2022, September 14, 2022 WIB
Last Updated 2022-09-14T10:22:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ देऊ नका : अजित पवार

Advertisement

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रातून गुजरात गेल्याच्या आरोपामुळे राजकीय आखाडा तापला आहे. अजित पवार यांनी फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये पवार यांनी  राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. वेदांता ग्रुपचा प्रकल्प गुजरातला होत असल्याने हा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ देऊ नका, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा तळेगाव येथे हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला नेण्यात आला. या प्रकल्पामुळे राज्यात १.५ लाख रोजगार निर्माण झाले असते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलगांणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात चर्चा केली. पण, या कंपनीने तळेगावची जागा निवडली होती. त्यासाठी 1000 एकरची जागा निवडली होती, असा खुलासा पवार यांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ३० मिनिटे चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये झालेल्या फोनवरील चर्चेत प्रामुख्याने वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.