#

Advertisement

Wednesday, September 14, 2022, September 14, 2022 WIB
Last Updated 2022-09-14T10:26:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

दिल्ली पोलिसांकडून जॅकलिनची चौकशी

Advertisement


मुंबई : दिल्लीतील मंदिर मार्गावर स्थित असलेल्या दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी हजर झाली आहे. सायंकाळपर्यंतही चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी अभिनेत्री नोरा फतेहीची चौकशी झाली होती. जवळजवळ सहा तास ही चौकशी चालली होती. त्यानंतर जॅकलिनची चौकशी केली जात आहे.
जॅकलिन फर्नांडिसची ही चौकशी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केली जात आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरने 200 कोटींचा गंडा लावल्याचा आरोप आहे. त्याने फोर्टेस हेल्थ केअरचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंह यांच्या पत्नीकडून 200 कोटी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या संपर्कात असल्याचा खुलासा झाला होता. यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीचं नाव प्रामुख्याने पुढं आलं होतं. त्यानंतर सतत या दोघींची चौकशी होत आहे.