Advertisement
शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ढोबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ढोबळे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मंगळवेढा परिसरातील शेकडो युवकांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या युवकांना अल्पोपहार तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदानास पसिरातील शेकडो युवकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यशस्वी रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत माजी मंत्री ढोबळे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

