Advertisement
आंदोलनात
केलेल्या बहुतांशी मागण्यांवर उपाययोजना
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे
यांच्यासमवेत विशेष बैठक
पुणे : "पार्टी' घेऊन
संबंधीत बिलास मंजुरी दिल्याच्या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करावी तसेच "बार्टी'च्या
उद्देशाची अंमलबाजवणी करण्याची आठवण करून देण्यासाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे
यांच्या नेतृत्त्वाखाली बहुजन रयत परिषदेने पुणे येथील "बार्टी' कार्यालयास "टाळे
ठोको आंदोलन' केले होते, याची दखल घेत "बार्टी'च्या अधिकाऱ्यांनी माजी मंत्री ढोबळे
यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. यासह अन्य मागण्या मान्य
करून त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे "बार्टी'च्या अधिकाऱ्यांकडून
सांगण्यात आले.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठीच्या कार्यक्रमाच्या नियोजनातील एक जबाबदारी "बार्टी' संस्थेकडे होती. परंतु, यामध्ये निवीदा काढण्याऐवजी भोजन ठेकेदाराला काम देणे, बेकायदेशीर खर्चाला व कामकाजाला मंजुरी देणे यासह संबंधीत कामाचे बील मंजुरीसाठी "पार्टी' मागणे, असा गैरकारभार चव्हाट्यावर आल्यानंतर या विरोधात बहुजन रयत परिषदेने दि. 8 फेब्रुवारीला पुण्यात बार्टी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यामध्ये बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुण्यातील आंदोलनानंतर या संदर्भात बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या पार्श्वभूमीवर "बार्टी'च्या संबंधीत अधिकाऱ्यांनी चर्चा करून या प्रश्नी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासंदर्भातील पत्र ऍड. कोमलताई यांच्याकडे देण्यात आले.
याबाबत माहिती देताना ऍड. कोमलताई यांनी सांगितले की, प.पू.बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध योजना व प्रकल्प विविध स्तरावर उपक्रम राबविणे, महाराष्ट्रातील अनुसुचित जातीतील तरुणांना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, उत्कृष्ट परिणामांसह त्यांचे स्वतःचे सूक्ष्म लघुउद्योग सुरू करणे, अनुसूचित जाती जमातीतील वंचित, बेरोजगार, अकुशल, अर्धकुशल प्रशिक्षणार्थी तरूण यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना कुशल व रोजगारक्षम स्वतःचे सूक्ष्म लघुउद्योग सुरू करणे आणि यशोगाधा तयार करणे, अनुसूचित जाती जमातीतील वंचित, बेरोजगार, अकुशल, अर्धकुशल प्रशिक्षणार्थी तरूणांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना कुशल व रोजगारक्षम बनवणे, समाजात समता विचार विकसित करणे आणि टिकवणे, समानता आणि सामाजिक न्यायाच्या विवीध क्षेत्रात संशोधन करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध उयोजना, प्रकल्प व उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाइन जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणालीद्वारे जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी अडचणीमुक्त व्यवस्था सुकर करणे, जात वैधता प्रमाणपत्राचे स्कॅनिंग, डिजिटायझेशन, इंडेक्सिंग, संग्रहण आणि शोध घेणे, त्यांच्या आधारभूत कागदपत्रांसह जुन्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करणे, सामाजिक न्याय, समानतेशी संबंधित सर्व क्षेत्रांना प्रोत्साहन देणे, सरकारला योजना आणि धोरणे तयार करण्यात आणि त्यात बदल करण्यास मदत करणे, समाजातील विविद घटकांमध्ये बंधुभाव वाढवणे आणि राष्ट्र एकात्मता प्रस्थापित करणे, समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी पुस्तके, जर्नल्स, नियतकालिके आणि शोधनिबंध प्रकाशित करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवणे. बार्टीच्यावतीने अंतरविभागीय प्रशिक्षण आयोजित करून मागासवर्गीय विकास महामंडळांना कार्यरत करणे, सांस्कृतिक उपक्रमामधून चांगले विचार आणि सामाजिक संदेश पसरविणे, शाहीर, तमाशा कलावंत बलुतेदार व कारागीर प्रवणचकांच्या माध्यमातून समाजाचे समरसता कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये जागृती करणे, अनुसूचित जातीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून सरकारी धोरणे कृतिबदल जागरूकता पसरविणे, संशोधनाद्वारे अनुसूचित जातीच्या विकासासाठी प्रामाणिक डेटा संकलित करणे, पदवीधर म्हणून कार्यालयात आलेला तरूण शिष्यवृत्तीसाठी सहयोग परिषद परिसंवाद आणि कार्यशाळा यांच्याद्वारे सुरू असलेल्या विविध संशोधनास प्रोत्साहन देणे, सामाजिक उपक्रमासाठी निधी जमा करण्याचे आवाहन करणे याचा "जीआर' काढून देणे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या. याबाबत शासकीय पातळीवर चर्चा करण्यात आल्यानंतर सदर विषयी महत्त्वपूर्ण बैठक बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे, असे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.
बहुजन रयत परिषदेचे मोठे यश....
बहुजन रयत परिषदेतर्फे आंदोलन करीत "बार्टी'कडे समाजबांधवांचे प्रश्न मांडण्यात आले होते. त्याचवेळी याबाबत ठोस उपयायोजना करण्याचे आश्वासन संबंधीत अधिकाऱ्यांनी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना दिले होते. परंतु, मध्यंतरीच्या काळात राज्यातील राजकीय उलथापालथ, मंत्रीमंडळ विस्तार आदी कारणांमुळे याबाबत काहीसा विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. परंतु, बहुजन रयत परिषदेने केलेल्या बहुतांशी मागण्या मान्य करीत त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी "बार्टी'ने केली असल्याने हे बहुजन रयत परिषदेचे मोठे यश मानले जात आहे.