Advertisement
पुणे : काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या चर्चांना उधाण आलं आहे. काहींनी तर काँग्रेसचे काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट तर केलीच, शिवाय पुण्याचे दोन भाग होण्याच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला.
पुणे महापालिकेचे किमान 2 भाग करण्याची आवश्यकता आहे, असं चंद्रकांत पाटील काल म्हणाले होते. यानंतर पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानामुळे पुणे महापालिकेचे भविष्यात दोन भाग होऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी गोवा राज्याचं उदाहरण दिलं होतं.
पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता आहे जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू . राज्य सरकार पुढे आज तरी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचं आहे.
