Advertisement
मुंबई : शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. सरकार कोसळण्यासोबतच शिवसेनेला मोठा धक्काही बसला कारण आमदारांसह खासदार, पदाधिकारी अशा अनेकांनी शिवसेनेची साथ सोडली. यापाठोपाठ आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा झटका बसणार असल्याचं समोर येत आहे. काँग्रेसचे नऊ आमदार भाजपाच्या संपर्कात असून लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
याबाबत मुंबईतील चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला आले असताना आदित्य ठाकरे प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, की आपण आता जर-तर अगर-मगरवर बोलण्यापेक्षा देवाचं दर्शन घेऊ. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिने झाले आहेत. या सरकारला किती गुण द्याल? असा सवालही त्यांना केला गेला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, की 'मी उत्सवाच्या दिवशी राजकारणावर बोलत नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही'
