Advertisement
औरंगाबाद : औरंगाबादच्या पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आमदार आणि रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी आयोजित केली, या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. आधी अजित दादा पवार टीका करत होते. आता सुप्रिया ताई सुळेपण करतात. पण टिका करणं त्याचं काम आहे आणि विकासाचं काम करणं आमचं काम आहे. या शब्दात एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. तसेच ते पुढे म्हणाले की, ताईंना मी सांगतो, हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत करतो. त्यात मी खंड पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. तुम्हाला चिंता का पडली आहे. कोण सरकार चालवत होतं, सर्वांना माहिती आहे. त्यांना पूर्वीची सवय आहे. मात्र, त्यांचा सगळा रिमोट काढून घेतल्याने त्यांना चिंता होत आहे, या शब्दात एकनाथ शिंदेंनी सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली.