Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत झालेल्या मेलोडी ड्राम्यावरून जयंत पाटील यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजीत पवार यांच्याआदी जयंत पाटील यांना बोलू दिल्याने अजीत पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर अजीत पवार यांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र जयंत पाटील यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी कसं काय पाटील बरं हाय का? काल दिल्लीत झालं ते खर हाय का? असे म्हणत चांगलाच चिमटा काढला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, जुन्या चित्रपटात एक गाणं होतं, ते खूप प्रसिद्ध झालं होतं. ‘कसं काय पाटील बरं हाय का, काल दिल्लीत झालं ते खरं हाय का?’ दिल्लीत काय झालं? जयंत पाटलांनी अजित पवारांना बोलू दिलं नाही. त्यानंतर अजित पवार रागारागाने निघून गेले. कारण जयंत पाटलांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं, परंतु ते काही होता आलं नाही. विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांची ‘दादागिरी’ काम करून गेली. त्याचं शल्य जयंत पाटलांच्या मनात होतं. महाराष्ट्रात अजित पवारांना थांबवता येत नाही, म्हणून दिल्लीत थांबवलं. मला त्यात पडायचं नाही, ती त्यांची अंतर्गत बाब आहे, असं एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.