Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत पहिल्यांदाच व्यापपिठावर आले. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार संजय मंडलीक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार जयंत पाटील, आमदार जयंत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी (ता. आजारा) येथे बांधलेल्या उचंगी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतर पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील उपस्थित होते. यावेळी राजकीय टोलेबाजी सुद्धा चांगलीच जोरदार रंगल्याने उचंगी प्रकल्पापेक्षा राजकीय रंग जोरात पहायला मिळाला.
या कार्यक्रमावेळी जयंत पाटील यांनी खासदार संजय मंडलीक यांचे शाब्दिक चिमटे घेतले ते म्हणाले कि, खासदार मंडलिक राज्यात आताचे सरकार आहे तोपर्यंत शिंदे गटात राहतील त्यानंतर ते आमच्या सोबत असतील असे म्हणताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या व हास्यकल्लोळ झाला. यावेळी व्यासपीठावरून मंडलिक यांनीही प्रत्युत्तर देत असे झाल्यास आपण पाच वाजता जाऊन राज्यपालांकडे शपथ घेऊ असे सांगितले. त्यामुळे व्यासपीठावर हास्यकल्लोळ रंगला.
