Advertisement
मुंबई : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नऊ आमदार भाजपच्या संपर्कात असून लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर काँग्रेसचे जेष्ठ्य नेते बाळासाहेब थोरात यांनी घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोकरावजी हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचेही यावेळी थोरात म्हणाले.