Advertisement
पुणे : तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली ४०-५० वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत आहात, पण राष्ट्रवादी काँग्रेसला तीन अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाहीत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं सुळेंनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. पडळकरांनी सुप्रिया सुळेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तसेच, कितीही दौरे केले, तरी राज्यात सत्ता येणार नाही, अशा आशयाचं विधान गोपीचंद पडळकरांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर, विश्वासघात न करता, पाठीत खंजीर न खुपसता एकदाही राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवता आलेलं नाही. त्यांनी दौरे करत बसावं, राज्यातल्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुरतं ओळखलं आहे. तुमचे कितीही दौरे झाले, तरी आता काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नको, असं म्हणणाऱ्या युवकांची फळी महाराष्ट्रात तयार झाली आहे, असं पडळकर म्हणाले आहेत.
