Team Lakshvedhi
Last Updated
2022-10-07T11:45:41Z
एसटीच्या 118 बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश
Advertisement
मुंबई : शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना स्थिगित देण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा असाच एक निर्णय घेण्यात येत आहे. एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी बैठकीत दिले आहेत. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या सर्व कर्माचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पगारवाढ आणि इतर मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी डवळपास सहा महिने संप पुकारला होता. यावेळी संप मिटवण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी वाटाघाटी करण्यात आली. मात्र, त्यानंतरही संप सुरुच होता. कामावर रुजू व्हा अन्यथा कारवाई करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला होता. यानंतर काही कर्मचाऱ्यांना हळुहळू कामावरुन बडतर्फ करण्यात आले होते. या 118 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली आहे.