Advertisement
ठाणे : दसरा मेळाव्याच्या दिवशी शिंदे गटातील शिवसैनिकांनी ठाकरे गटातील महिला शिवसैनिकांना अश्लिल इशारे केल्यानंतर या शिवसैनिकांना चोप देण्यात आला होता. यानंतर आता आक्षेपार्ह घोषणा केल्याने ठाणे शहर पोलिस स्टेशनमध्ये ठाकरे गटातील शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नरेश म्हस्के यांच्या विरोधात घोषणा केल्या होत्या. “निम का पत्ता कडवा है, नरेश म्हस्के….. है , अशा शब्दात त्यांनी घोषणा दिल्या होत्या. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ठाण्यातील चिंतामणी चौक येथुन रॅली निघाली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क येथे जाण्यास खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्त्वात ही रॅली निघाली होती. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नरेश म्हस्के यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. यामुळे ठाणे पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकूण 14 शिवसैनिकांवर हा गुन्हा दाखल केला आहे.
