#

Advertisement

Thursday, October 13, 2022, October 13, 2022 WIB
Last Updated 2022-10-13T10:43:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रशहर

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा...

Advertisement

 मुंबई : हायकोर्टाने याप्रकरणी सुनावणी देताना मुंबई महापालिका प्रशासनाला ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत राजीनामा स्वीकार करावा, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच पालिका आयुक्तांनी राजीनामा मंजुरीबाबत ऋतुजा लटके यांना स्पष्ट रिप्लाय द्यावा आणि कोर्टाला माहिती द्यावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके आणि उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा हा खूप मोठा दिलासा आहे. 
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून याआधीच उमेदवाराची घोषणा झाली आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर झालीय. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. पण राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या दोन दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात संभ्रमाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासाठी पक्षादेश सर्वश्रेष्ठ आहे. पक्षाने सांगितलं तर आपण पोटनिवडणुकीला उभं राहणार नाही, अशी प्रतिक्रिया मुरजी पटेल यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
भाजप आणि शिंदे गटात उमेदवार ठरवणं आणि पोटनिवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी घडामोडी एककीकडे घडत होत्या तर दुसरीकडे ठाकरे गटात प्रचंड वेगाने घडामोडी घडत होत्या. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने स्वीकारलेला नव्हता. त्यामुळे त्यांची उमेदवारीच धोक्यात आली होती. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने स्वीकारला नाही तर ठाकरे गटाकडून प्लॅन बी आखला जात होता, अशी माहिती सूत्रांकडून येत होती. पण या दरम्यान शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेवकांच्या अंतर्गत गटबाजीचा प्रश्न उपस्थित होण्याची चिन्हं दिसत होती. या सगळ्या घडामोडी समांतरपणे घडत होत्या. या दरम्यान ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने दिलासा दिला.