#

Advertisement

Thursday, October 13, 2022, October 13, 2022 WIB
Last Updated 2022-10-13T10:49:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत सर्वात महत्त्वाची "अपडेट"

Advertisement

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंनी आपला उमेदवारही घोषित केला. मात्र, त्यांच्या उमेदवाराचा राजीनामा BMC कडून स्वीकारला गेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपला राजीनामा स्वीकारला जावा, अशी मागणी केली. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
लटकेंचा राजीनामा आदेश मंजुर करण्यात आल्याची माहिती समोर आला आहे. हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे लटकेंना ठाकरेंकडून निवडणूक लढवण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटासाठी ही अटीतटीची लढाई आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या बाजूने ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी बीएमसीत राजीनामा टाकला होता. अखेर बऱ्याच युक्तीवादानंतर उच्च न्यायालयाने तो मंजूर केला आहे.