#

Advertisement

Friday, October 14, 2022, October 14, 2022 WIB
Last Updated 2022-10-14T11:22:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

दसरा मेळाव्यातील कोणाचंही भाषण मी ऐकलं नाही, का ऐकावं?

Advertisement


औरंगाबाद : मी दसऱ्याच्या मेळाव्यातील कुणाचेही भाषण ऐकले नाही. का ऐकावे भाषण? भाषणात नागरिकांच्या समस्येवर कोण बोलले का? शेतकरी आत्महत्येवर कुणीच बोलले नाही. या भाषणात फक्त चिखलफेक होती, त्यामुळे मी कुणाचंही भाषण ऐकलं नाही',  असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजिव अमित ठाकरे केलं आहे.
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना अमित ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळावा आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत घरोबा केला आहे. या राजकीय घडामोडीमुळे राज्यातले राजकारण गढुळ झाले आहे. 'मी आधीच राजकारणात आलो ते बर झालं. आजची परिस्थिती पाहता मी आताच्या काळात राजकारणात आलो नसतो,  असंही वक्तव्य अमित ठाकरे केलं आहे. राज्यातील या राजकारणाला लोक कंटाळली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसेला लोक पसंद करतील. दोन शिवसेना झाल्यामुळे आम्हाला संधी दिसते आहे. तरुणांच्या मनात प्रचंड असंतोष आहे त्यावर मी फुंकर घालणार आहे' असंही अमित ठाकरे म्हणाले.