#

Advertisement

Friday, October 14, 2022, October 14, 2022 WIB
Last Updated 2022-10-14T11:28:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मला जाणीवपूर्वक "टार्गेट" केलं जात आहे !

Advertisement


धुळे : शिक्षक भरती प्रकरणावरून एका विद्यार्थ्यासोबत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अखेरीस, या वादावर महाजन यांनी खुलासा केला आहे, कालपासून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. 400 ते 500 लोकांनी मला सारखे फोन केले. पण हा विषय माझ्या खात्यातला नाही. यावर शिक्षण विभाग लवकरच निर्णय घेईल, असं आश्वासन महाजन यांनी दिलं.
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर महाजन हे पहिल्यांदाच धुळ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबद्दल गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 
'मला वाटतं खरं, प्रामुख्याने हा विषय माझा नाही. शिक्षक जरी भरायचे असले तरी जिल्हा परिषदमध्ये काम करतात. याबद्दलचा निर्णय हा शिक्षण खाते करत असतं. दीपक केसरकर हे त्या खात्याचे मंत्री आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, हा विषय छोटा आहे. कालपासून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. 400 ते 500 लोकांनी मला सारखे फोन केले. मी त्यांना सांगितलं की, सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिक्षक कमी आहे, याबद्दल चर्चा झाली होती शिक्षण खात्याने याबद्दल मनावर घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ते दोन महिन्यात निर्णय घेणार असं आश्वासन दिलं आहे. सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे' असं महाजन यांनी सांगितलं.