#

Advertisement

Saturday, October 1, 2022, October 01, 2022 WIB
Last Updated 2022-10-01T11:24:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

अजितदादांनी आता किर्तनं ऐकावीत...

Advertisement

सोलापूर : उद्धव ठाकरे आणि शिंदेंचं भाषण सोबतच सुरू झाल्यास आधी ठाकरेंचं भाषण ऐकणार. यावरुन अजित पवारांना टोला लगावत आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, की  अजित दादा आधी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकणार आहेत. दादाला आता भाषण ऐकण्याशिवय काय काम उरलं नाही. इंदुरीकर महाराज यांची कीर्तनं त्यांनी ऐकावी.विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आमदार शहाजी बापू पाटील यांनी चिमटे काढले आहेत. 
शिवतीर्थावर जाणारे पवारांच्या विचाराचे, तर बीकेसीवर जाणारे बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक असतील, असं आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर तर शिवतीर्थावर ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. बीकेसी मैदानावर होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा जोरदार होणार आहे. जे शिवतीर्थावर जातील ते शरद पवार यांच्या विचाराचे तर बीकेसीवर जमणारे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे. 
शरद पवारांनी एकदा महाराष्ट्राचा दौरा केली की राष्ट्रवादी सत्तेत येते, असा दावा सुप्रिया सुळेंनी केला होता. मात्र, शरद पवार कुठेही फिरले तरी त्यांचा आकडा 50 आमदारांच्या वर जात नाही. एवढ्यातच त्यांचा खेळ सुरू आहे, असा टोला शिंदे गटाचे शहाजीबापू यांनी लगावला आहे.