Advertisement
सांगली दौऱ्यावर आज सुप्रिया सुळे आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाच्या आमदार-खासदारांनी कायदा-सुव्यवस्थेबद्दल टीका केली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आत्ता आत्मचिंतन करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगंगत नेते आर आर पाटील गृहमंत्री असताना राज्याची काय स्थिती होती आणि आता परिस्थिती दुर्दैवी बनली आहे. राज्यातील सरकार हे ओरबाडून आणलेले आहे. टीका झाल्यानंतर तीन महिन्यानंतर पालकमंत्री नेमले आहेत. अनेक मंत्री अजून त्यांच्या विभागातच गेलेले नाहीत. तर मंत्रालयात गेले तर अनेक मंत्रीच भेटत नाहीत. ओरबाडून सरकार स्थापन केलं. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
