Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधकांचे पुढील टार्गेट असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही रोहीत पवार म्हणाले.
शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याने ठाकरे कुटुंबाला मोठा धक्का बसला. पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबात देखील फूट पडल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्य शिंदे गटाच्या स्टेजवर पाहायला मिळाले. यानंतर आता पवार कुटुंबाताही अशीच फूट पाडण्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. विरोधक पवार कुटुंबात फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. मात्र, काहीही झाले तरी पवार कुटुंबात फूट पडणार नसल्याचा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे केंद्रात आहेत, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आम्ही राज्यात आहोत, त्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितले.
