#

Advertisement

Monday, October 17, 2022, October 17, 2022 WIB
Last Updated 2022-10-17T11:43:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

राज ठाकरे यांना श्रेय द्यायचे असेल तर देऊन टाका...!

Advertisement

पुणे : 'अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपने माघार घेऊन याची मला खात्री होती. काही तरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अखेर त्यांनी निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी समाधानी आहे, 6-7 अपक्ष आहे त्यातला एक जरी राहिला तरी निवडणूक होतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसंच, राज ठाकरे यांना याचे श्रेय द्यायचे असेल तर देऊन टाका, असा टोलाही पवारांनी लगावला.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपवर माघार घेण्याची मोठी नामुष्की आली. भाजपने माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विनंती केली. भाजपने अखेर आज माघार घेतली. यावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपने माघार घेईल याची मला खात्री होती. काही तरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अखेर त्यांनी निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी समाधानी आहे, असं पवार म्हणाले.' माझा सजेशन होत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी जर सकारात्मक परिणाम झाला तर बरं वाटेल, राज ठाकरे यांना श्रेय दिलं तरी मला चालेल, असंही पवार म्हणाले.
'एकदा त्यांनी माघार घेतली तर मी शंका किंवा काही बोलणार नाही. मुळात ही पोटनिवडणूक होती. रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे ही निवडणूक होत होती. त्यांच्या पत्नीला जागा मिळणार अशी शक्यता होती. आधी निर्णय घेतला असता तर फायदा झाला असता का, तर निर्णय आता झाला किंवा आधी झाला, या पेक्षा निर्णय घेतला हे महत्त्वाचं आहे, असंही पवार म्हणाले.