#

Advertisement

Thursday, October 20, 2022, October 20, 2022 WIB
Last Updated 2022-10-20T17:01:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मनसेचंही टार्गेट पवारांची 'बारामती'

Advertisement

पुणे : भाजपनंतर आता मनसेनेही शरद पवारांच्या बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या बारामती मतदारसंघात आल्या होत्या. यानंतर आता राज ठाकरेंनीही बारामतीसाठी दंड थोपटले आहेत.
पुण्यात आज मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत खडकवासला, भोर, मुळशी तालुक्यातील काही स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रवेश पार पडले. आगामी मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे पक्ष प्रवेश झाले. तसंच यावेळी काही नवीन नियुक्त्याही जाहिर झाल्यात. गेल्या आठवड्यात शिंदे गट पुणे मनसेला खिंडार पाडणार असल्याच्या बातम्या काही माध्यमातून छळकल्या होत्या. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेनं लागलीच काही पक्षप्रवेश लाईनअप करून राज ठाकरे यांच्याहस्ते हे प्रवेश घडवून देखील आणले. 
स्वत: राज ठाकरेंनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने पुण्यातील मनसैनिकांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झालंय. आजच्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात छावा ग्रुपचे पै. संतोष आप्पा आखाडे यांची खडकवासला विधानसभा प्रमुख म्हणून तर आप्पा दसवडकर यांची मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आजच्या हे पक्ष प्रवेश प्रामुख्याने बारामती लोकसभा मतदारसंघातले असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. यावेळी इतर छोटेमोठे कार्यकर्ते मनसेत दाखल झालेत. त्यामुळे मनसेची ही नवी जुळवाजुळव पुणे मनसेला खरंच नवसंजीवनी देणारी ठरवणार का? आणि संभाव्य गळती थांबवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण भाजपसोबत गेल्याशिवाय अपेक्षित यश मिळणार नाही, अशी कबुली खुद्द पक्षाचेच कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवत आहेत.