#

Advertisement

Thursday, October 20, 2022, October 20, 2022 WIB
Last Updated 2022-10-20T16:54:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी शिरीष सरदेशपांडे

Advertisement

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर पोलीस अधीक्षक पदी पोलीस अकादमी नाशिकचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  
राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. त्यामध्ये सोलापूर पोलीस अधीक्षक पदी सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन राबवून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ग्रामस्थांना इतर व्यवसायाकडे वळवले हा त्यांचा उपक्रम लोकसभेमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. चांगले काम होत असताना केवळ दोन वर्षाच्या आतच सातपुते यांची बदली करण्यात आली आहे.