Advertisement
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत पूत्र आणि उद्धव ठाकरे यांचे सख्खे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव ऍड. निहार ठाकरे आणि खासदार धैर्यशील माने यांची भेट घेत बहुजन रयत परिषदेच्या महिला अध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. मुंबईतील ठाकरे घरातील आणि सोलापुरातील ढोबळे घरातील दोन मातब्बर वकील समोरासमोर आल्याने मुख्य विषयांवर मुद्देसुद चर्चा झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार
धैर्यशील माने, बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे हे ही
उपस्थित होते.
यावेळी ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी बहुजन रयत परिषदेच्या कार्याविषयी माहिती दिली. मातंग समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत खासदार धैर्यशील माने यांनी बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. शिवसेनेत नीलम गोऱ्हे हे नाव सोडले तर दुसरे नेतृत्त्व कधी तयार झाले नाही का ते तयार करण्याची गरज पक्षाला वाटली नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी पक्षाची सत्ता जाण्याला एकंदरीतच महाराष्ट्रात महिला नेतृत्वाला डावलल्याचाही परिणाम असू शकतो, असा मुद्दा मांडला असता खासदार माने यांनीही त्यास सहमती दर्शवित राजकारणामध्ये महिलांसाठी कोणत्या पद्धतीने काम करता येईल, वरही मुख्यमंत्र्यासोबत एक बैठक घेऊया, असे आश्वासन दिले.
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी बहुजन रयत परिषदेतील राज्यभरात सुरू असलेले कार्य, तसेच दलित समाजावर होणारे अन्याय, महामंडळांवरील नेमणूका, रखडलेले अनुदान आदी विषय मांडले. याबाबत बहुजन रयत परिषदेचे संस्थापक तथा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे सुरू असलेले कार्य तसेच शासनाकडील पाठपुरावा याबाबतही ऍड. साळुंखे-ढोबळे यांनी ऍड. निहार ठाकरे यांना माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विविध याचिकांवर वकील म्हणून ऍड. निहार ठाकरे न्यायालयीन कामकाज पाहत आहेत.