#

Advertisement

Tuesday, October 11, 2022, October 11, 2022 WIB
Last Updated 2022-10-11T12:00:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली : लक्ष्मण ढोबळे

Advertisement

नवी दिल्ली : हिंदुत्वाच्या प्रखर विचाराबाबत बाळासाहेबांनी कधीही समझोता केला नाही. परंतु, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली, अशा शब्दांत माजी मंत्री तथा भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, हिंदुत्वाचा विचार सोडून ज्या दिवशी मी कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी करेल त्यावेळी मी शिवसेना बंद करेल, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली होती. परंतु, केवळ मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी वडिलांनी आयुष्यभर दिलेला विचार बाजूला सारून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विरोधकांच्या गळ्यात पडणे, ही गोष्ट बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करण्यासारखी आहे. बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा करीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद घेतले. बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाण्यापेक्षा त्यांचे विचार बाजूला सारून मुख्यमंत्रिपद घेतले, ही गद्दारीच आहे, असेही ढोबळे यांनी सांगितले.
"मातोश्री'चा उंबरा ओलांडणे उद्धव ठाकरे यांना शक्‍य झालेले नाही. सत्ता संपत्तीच्या अंधारात सत्य दिसत नाही, ते शोधायला काहीसा उशीर झाला, याच कारणातून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना "मशाल' दिली असल्याचा टोलाही ढोबळे यांन ठाकरे यांना लगावला.
ढोबळे म्हणाले की, उद्धव ठाकरे आपण कधी ती मागासवर्गीयांच्या प्रश्‍नांवर बोलला आहात काक्ष् ज्या-ज्या वेळी राज्याच्या प्रमुख पदावर बसलेल्या माणसाला पुत्रप्रेमाने झपाटले. त्या-त्या वेळी राज्याच्या नेतृत्वाचा ऱ्हास झालेला आहे. राजकारणात नात शिरले की, विचार थांबतो, असेही ढोबळे यांनी स्पष्ट केले.