#

Advertisement

Saturday, October 1, 2022, October 01, 2022 WIB
Last Updated 2022-10-01T11:47:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मी देवाला काहीच मागत नाही...

Advertisement


पुणे : खोके सरकारने आमच्यावर टीका करणंच हास्यास्पद आहे. मी देवाला काहीच मागत नाही, फक्त आशीर्वाद घेतो, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. 
शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यात वेगेवगळ्या नवरात्र मंडळांमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेत आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले. 'शिवसंवाद यात्रेनिमित्त दौरे करत आहे, उद्धव ठाकरेही बाहेर पडणार आहेत. अनेक जण मातोश्रीवर येऊन भेटत आहेत. पक्षप्रवेशही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. जनतेचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्यावर आहे, अनेक जण वेगवेगळे मेळावे करू शकतात, पण परंपरेनुसार आमचा म्हणजेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार आहे, तो कायम तसाच राहणार, असा टोला आदित्य ठाकरेंनी हाणला.