Advertisement
एकीकडे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते युती निश्चित असल्याचं बोलत असले तरी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र सिल्लोड मतदारसंघात येणाऱ्या निवडणुका भाजप आणि शिंदे गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे, असं म्हणत वेगळी भूमिका मांडली आहे.
सिल्लोडमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत, भाजपचे फक्त 2 आहेत, मग भाजपला जास्त जागा कशा द्यायच्या? अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. एकत्र लढलो तर भाजप आणि शिंदे गटात संघर्ष होईल, म्हणून मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी भावना आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.
सिल्लोडमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होऊ द्या, सगळ्या निवडणुकींतनंतर सत्तेत शिंदे गट आणि भाजपच राहील, असा विश्वासही अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
