#

Advertisement

Tuesday, October 25, 2022, October 25, 2022 WIB
Last Updated 2022-10-25T07:33:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

ब्रह्मपुरी येथे वेळेत शिधा वाटप; ढोबळे यांनी केल्या होत्या सूचना

Advertisement


सोलापूर : माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते ‘कृतज्ञ दिवाळी शिधा' वाटप भाजपा, बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी तसेच रेशन दुकानदार संदीप पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मौजे ब्रह्मपुरी येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला. राहटेवाडी येथील ग्रामस्थांना वाटप करण्यात आलेल्या शिधेत रवा,मैदा ,पिठीसाखर, तेल,बेसनपीठ,डालडा, भाजके पोहे,मिठपुडा आदी साहित्याचा समावेश आहे. किमान एक हजार कुटुंबाना दिवाळीचा आनंद घेता येईल, यासाठी शिधा वेळेत वाटप करण्यात येत आहे. 

‘कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रात असलेली मंदी पाहता सर्व कुटुंबियांना दिवाळी चे नियोजन करताना अडचणी येत आहेत. दिवाळी सणाच्या दिवसात हे अडचण ,नैराश्याचे मळभ दूर करण्यासाठी शिधा वेळेत मिळावा यासाठी सूचना करण्यात आल्या होत्या, असे लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले. या उपक्रमाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.